
जंगलात सफारीमध्ये गाडीतून खाली उतरू नये, खिडकीच्या काचा बंद ठेवाव्यात अशा काही नियमांचे पालन करणे पर्यटकांना बंधनकारक असते. मात्र या पर्यटकांनी नियमांचे पालन न केल्याने एका जिराफाची मान कारच्या खिडकीत अडकल्याची घटना इंग्लंडमधील वेस्ट मिडलॅण्ड सफारी पार्पमध्ये घडली आहे.
येथे एक जोडपे कारमधून फिरत होते. ती महिला चालकाच्या बाजूच्या सीटवर बसली होती. त्यांच्या कारची काच उघडी असल्याने जिराफाने कारच्या खिडकीतून आत तोंड घातले. मात्र घाबरलेल्या महिलेने घाईघाईने काच बंद करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचं तोंड बाहेर काढण्यासाठी जिराफाने मानेला जोरात झटका दिला अन् खिडकीची काच तुटली.




























































