
गीता प्रेस, गोरखपूरने गांधी शांतता पुरस्कारासाठी 1 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की ते फक्त प्रशस्तिपत्र स्वीकारतील, रोख पारितोषिक नाही.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरींनी रविवारी एकमताने गीता प्रेसची निवड करण्याचा निर्णय घेतला.
मानधन स्वीकारण्यास नकार देत गीता प्रेसने सरकारने हा पैसा इतरत्र खर्च करावा, अशी विनंती केली आहे. गीता प्रेसनं सांगितलं की, ते केवळ प्रमाणपत्र स्वीकारतील.
गांधी शांतता पुरस्काराची घोषणा रविवारी करण्यात आली. एक कोटी रुपयांचं बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या बक्षिसाचं स्वरुप आहे.
गीता प्रेसला पुरस्कार देण्याच्या निर्णयावर काँग्रेसनं टीका केली होती. पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी या निर्णयावरून सरकारला लक्ष्य केलं आणि पुरस्कारासाठी गीता प्रेसच्या निवडीला ‘विडंबन’ म्हटलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पुरस्कारासाठी गीता प्रेसचे अभिनंदन केलं आणि त्यांच्या क्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं.




























































