
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ टेम्पोतून लपवून नेत असलेले गोवा बनावटीची 48 लाखाची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केली. टेम्पोत ठेवलेल्या मैद्याच्या पिठाच्या पोत्याच्या आड दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते. याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत सकाळी धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी रवि चंद्रकांत जाधव (वय 28 वर्षे रा . विनोबा भावे खारबाय रोड भिवंडी जि . ठाणे) नरेंद्र रामसेवक गुप्ता (वय 32 वर्षे रा . खारबाव रोड अंजुर फाटा, भिवंडी जैन मंदिराच्या समोर जि ठाणे), सिध्दार्थ मधुकर घोडके (वय 35 वर्ष रा. हनुमान नगर दहिसर चेकनाका केतकीपाडा दहिसर ईस्ट मुंबई) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ए), (ई) 80, 81, 83, व 90 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचे मालवाहू टेम्पो क्रमांक एमएच 04 जेके 7901 व क्रमांक एमएच 04 जेके 9573 मध्ये विविध ब्रॅन्डच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारू चे 750 मिली मापाचे 130 बॉक्स (1560 बाटल्या), 180 मि.ली मापाचे 265 बॉक्स (12720 बाटल्या) व 500 मि ली मापाचे 160 बॉक्स (3840 टीन ) अशी 48 लाख 23 हजार 8 9 4 व दारु जप्त करण्यात आली. तर वाहनांची किंमत 16 लाख मिळून एकूण रु. 64 लाख, 23हजार, 894 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.



























































