पोकर चॅम्पियनशिपला सुरुवात

182

नुकत्याच सुरू झालेल्या 2020 वर्षामधील सर्वात मोठय़ा पोकर चॅम्पियनशिपची प्रतीक्षा एकदाची संपली आहे. कारण स्पार्टन पोकरच्या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱया इंडिया पोकर चॅम्पियनशिपचा (आयपीसी) शुभारंभ गोवा येथे सुरू झाला आहे. या दिमाखदार टुर्नामेंटची रंगतदार सुरुवात गोवा येथील बिग डॅडी कॅसिनो येथे झाली असून खेळाचा थरार 19 जानेवारी 2020 पर्यंत कायम राहणार आहे. या टुर्नामेंटविषयी बोलताना स्पार्टन पोकरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अमीन रोझानी म्हणाले की, ‘आम्ही सर्व जण इंडिया पोकर चॅम्पियनशिप ऍवॉर्डस्ची तिसरी आवृत्ती साजरी करत आहोत. आजच्या युगातील कौशल्यपूर्ण आणि रणनीतीने खेळणाऱया नवोदित खेळाडूंना एक सर्वोत्तम मार्ग उपलब्ध करून देणे ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. यंदाच्या वर्षाकरिता सर्वाधिक प्रेरणादायक बाब म्हणजे आमचे निष्णात खेळाडू आणि विजेत्यांनी इतरही पोकर मंचावर बाजीगर ठरले आहेत. शिवाय ते ‘आयपीसी’ पुरस्काराचे मानकरीदेखील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या