गोव्यात होतेय तळीरामांची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण

2280
प्रातिनिधिक

गोवा आणि दारू असे समीकरण आहे. मात्र गोव्यात दारू पिणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. वजन माप खात्याने आज थिवी आणि सांकवाळ औद्योगिक वसाहतीत मद्याच्या बाटल्या भरण्याच्या कारखान्यांवर छापे टाकून 1 कोटी 72 लाख रूपयांचा माल जप्त केला. याठिकाणी नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा कमी मद्य बाटल्यांमध्ये भरले जात होते.

थिवी औद्योगिक वसाहती मध्ये टाकलेल्या छाप्यात नमूद प्रमाणापेक्षा कमी मद्य भरलेल्या 42 हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याचा अंदाजे बाजारभाव 1.51 कोटी आहे. तर साकवाळ औद्योगिक वसाहतीत टाकलेल्या दुसऱ्या छाप्यात नमूद प्रमाणापेक्षा २० मिली कमी भरलेल्या मद्याच्या ४२०० बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत 21.5 लाख आहे.

आपली प्रतिक्रिया द्या