सोने-चांदीला पुन्हा झळाळी; सोने तीन महिन्यांच्या उच्च्यांकी स्तरावर…जाणून घ्या आजचे दर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात आठवड्याभरापासून कमी झालेल्या सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आता तीन महिन्यांच्या उच्च्यांकी पातळीवर पोहचले आहे. सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी आली आहे.

वायदे बाजार आणि सराफा बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 48,181 रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तीन महिन्यांच्या उच्च्यांकी स्तरावर पोहचले आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. शुक्रवारी सोन्याचे दर 47,757 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत घसरले होते. तर सोमवारी हे दर 48,181 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढले आहेत. तर वायदे बाजारात जूनच्या सौद्यांसाठी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,070 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढे आहेत.

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही तेजी दिसत आहे. सराफा बाजारात चांदीचे दर 71,505 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत. शुक्रवारी चांदीचे दर 70,360 रुपये प्रतिकिलो होते. तर वायदे बाजारात जुलै महिन्यांच्या सौद्यासाठी चांदीचे दर 72,232 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तीन महिन्यांच्या उच्च्यांकी स्तरावर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कमजोर होत असलेला डॉलर, जागतिक बाजारातील नकारात्मक परिस्थिती आणि कोरोनाचा सुरू असलेला कहर यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे काही देशात लॉकडाऊन लागू असल्याने त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.