
हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्त नागम अलीवेणी यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ 233 ग्रॅम वजनाचे 12 लाख 17 हजार 425 रुपये किमतीचे सोन्याचे फूल श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले. सदरची देणगी स्वीकारताना संस्थानचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.
























































