गुगलने जगातील पहिले रिटेल स्टोअर उघडले

गुगलने न्यूयॉर्कमध्ये जगातील पहिले रिटेल स्टोअर सुरू केले आहे. हे अतिशय हायटेक आणि आलिशान स्टोअर असून ते बघून कुणीही थक्क होईल. स्टोअरमधून हार्डवेयर, सॉफ्टवेअर आणि अन्य प्रकारची उत्पादने खरेदी करता येतील. याबद्दल गुगल सीईओ  सुंदर पिचई यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऍपल कंपनीचे अनुकरण करत गुगलने स्वत:चे स्टोअर उघडले आहे. न्यूयॉर्कच्या चेल्सी भागात 5 हजार चौरस फुटांवर स्टोअर विखुललेला आहे. हा स्टोअर 24 भाषांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. त्यात प्रवेश करताच उत्पादनांचा डिस्प्ले दिसेल. त्यानंतर मोठय़ा झगमगाट असलेल्या खोलीत गुगलची उत्पादने दिसतील. जर एखादा ग्राहक गुगलचा पिक्सेल फोन वापरतो आणि त्यात काही दोष आढळला, तर या रिटेल स्टोअरमध्ये तो दूर करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या