लघु, मध्यम उद्योजकांना गुगल देणार डिजिटल व्यासपीठ

लॉकडाऊनमुळे ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लघु आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी गुगलने जोहो, इन्स्टामोजो, डूंजो आणि स्विगी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केल्याची आज घोषणा केली आहे.

जोहोद्वारे लघु आणि मध्यम उद्योजक बिझनेस वेबसाईट तयार करू शकतात. तसेच जोहो कॉमर्सवरून आपली उत्पादने विकू शकतात. त्यासाठी 31 मार्चपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर डिजिटल पेमेंट इन्स्टामोजो देखील सहा महिने फ्री सबस्क्रिप्शन देणार आहे. ऑर्डर ऑनलाईन स्वीकारण्यासाठी आणि डिलीव्हरीसाठी डूंजो आणि स्विगीची मदत होणार आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांना बळकटी देण्यासाठी मेक स्मॉल स्ट्रॉंग ही मोहीम आम्ही हाती घेतली आहे. याद्वारे उद्योजकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही इंडस्ट्रीमधील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी केल्याचे गुगल इंडियाच्या शालिनी गिरीश यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या