चंद्रपूर : गोसेखुर्दचा कालवा फुटला, भात शेतीचं प्रचंड नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gosikhurd-canal-break

गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्यानं पूर ओसरायला लागलं आहे. मात्र दुसरीकडे या पुराने मोठी हानी केल्याचं चित्रही समोर येऊ लागलं आहे. गोसेखुर्द धरणाचा मोठा कालवा चौगान या गावाजवळ फुटल्यानं परिसरातील शेकडो हेक्टर भात पीक पाण्याखाली आलं आहे. शासकीय मालमत्तेसह लोकांच्या खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान यानिमित्तानं समोर येऊ लागलं आहे. सोमवारी खरकाडा गावाजवळ चार जागी हा कालवा फुटला होता. तर आज चौगानजवळ त्याचा मोठा भाग वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.