चारित्र्याच्या संशयावरून तलाठी पतीकडून डॉक्टर पत्नीचा चाकूने खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात प्रेमविवाहानंतर दोन वर्षांनी तलाठी असणाऱ्या पतीने डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा डोक्यात हातोडा आणि चाकूने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

डॉ. सरला विजय साळवे (वय 32, रा. बोहाडेवाडी, मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. विजयकुमार साळवे असे फरार झालेल्या पतीचे नाव आहे.

डॉ. सरला या बीएएमएस असून, पुण्यातील नायडू रुग्णालयात नोकरीला होत्या. तर, आरोपी विजयकुमार हा तलाठी असून, जुन्नर येथे तो कार्यरत आहे. विजयकुमार आणि सरला या दोघांचा दोन वर्षांपूवी प्रेमविवाह झाला आहे. सरला या मूळच्या भंडारा येथील तर, विजयकुमार हा गोंदिया येथील आहे. दोघे मोशीतील बोहाडेवाडी येथे वास्तव्यास होते. विजयकुमार हा पत्नी सरला हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.

शनिवारी रात्री सरला झोपेत असताना विजयकुमारने तिच्या डोक्यात हातोड्याने वर्मी घाव घातला आणि चाकूने वार केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आरोपी विजयकुमार घटनेनंतर फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.