महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

जिल्ह्यातील पाचही पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्यावर बुधवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा हिंगोलीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी या आंदोलनाला भेट देऊन ग्रामसेवकांच्या न्याय मागण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनकडुन वेगवेगळ्या मागण्यासाठी शासन तसेच जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने ग्रामसेवकांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारत असहकार पुकारण्याचा इशारा दिला आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, मंचक भोसले, राजेश किलचे, गंगाधर सोळंके, शिवाजी खरात, एस.एस. खाडे यांच्यासह दिडशेच्यावर ग्रामसेवकांनी सहभाग नोंदविला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, जि.प. गटनेते अंकुश आहेर, सभापती प्रतिनिधी भानुदास जाधव, डी.वाय. घुगे यांनी ग्रामसेवकांच्या आंदोलनस्थळी जाऊन मागण्यांबाबत चर्चा केली. या पाश्र्वभुमिवर जि.प. प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.