तरुण वयातच केस पांढरे का होतात? त्यावर तुम्ही काय करू शकता?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
माणसाच्या सौंदर्यात भर घालण्यात त्याच्या केसांचा खूप मोठा हात असतो, आणि माणूस हा कोणाच्याही केसांवर पहिले भुलतो कारण दाट काळेभोर आणि नीट नेटके केस तुमची वेगळीच छाप समोरच्या व्यक्तीवर पाडतात! आणि फक्त काळेभोर दाट केस असून चालत नाही, त्यांची एक विशिष्ट फॅशन असेल तर ते आणखीनच खुलून दिसते! अवेळी टक्कल पडणे, केस गळणे, केसांची वाढ नीट न होणे, केस लवकर पांढरे होणे, त्यासाठी वापरला जाणारा हेयर डाय आणि त्यातली रसायने या अशा समस्यांना माणूस सुद्धा तितकाच जबाबदार आहे! कारण केसांची योग्य काळजी न घेण किंवा त्यांना योग्य ते पोषण न मिळणं यामुळेच या समस्या उद्भवतात! काळे, चमकदार केस हे सर्वांनाच हवे असतात. पण सर्वच एवढे नशीबवान नसतात. आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अवेळी केस पांढरे होणे हे आता सामान्य झाले आहे. कारण आता ६० नाही तर ३० वय असतानाचा लोकांचे केस पांढरे होतात. पण तुम्हाला माहित आहे की, असे अवेळी केस का पांढरे होतात ते? तर ह्यामागे अनेक कारण असतात. अवेळी केस पांढरे होणे ह्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत, तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
अवेळी केस पांढरे होणे ह्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे तणाव. तणाव आपल्याला वेळेआधीच वृद्धत्वाकडे घेऊन जातो. मेलानिन हे एक असं तत्व आहे जे आपल्या केसांना काळं ठेवण्याचं काम करत. जेव्हा मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करणे थांबवतं तेव्हा आपले केस हे पांढरे होऊ लागतात. जसं शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या जीवनसत्वांची गरज असते तसचं केसांना काळे ठेवण्यासाठी जीवनसत्व बी -१२ महत्वाचे असते. ह्याच्या कमतरतेमुळे मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करू शकत नाही. ज्या लोकांना नेहेमी डोकेदुखीचा त्रास असतो किंवा सायनस हा आजार असतो त्या लोकांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होतात.
आजकाल केसांना रेशमी, चमकदार बनविण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत. त्याच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्या बघून आपल्या सारखे लोक ते केमिकल युक्त शाम्पू वापरतात. ह्यामुळे देखील केस पांढरे होतात.
आजकाल फक्त वृद्धांनाच नाही, तर लहान मुलांना तसेच तरुणांना देखील मधुमेह हा आजार होतो आहे. केस पांढरे होण्याचं हे देखील एक महत्वाचं कारण आहे. जर तुम्ही मद्यपान, धुम्रपान,अमली पदार्थ इत्यादी गोष्टींच्या आहारी गेले असाल, तर हे देखील तुमचे केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अवेळी केस पांढरे होण्याचं एक कारण अॅनिमिया हे देखील असू शकतं. ह्यात शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे केसांना योग्य ते पोषण मिळत नाही, ह्यामुळे देखील केस पांढरे होऊ शकतात.
 रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दिवसभर काम करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कारण शरीरासाठी झोपं ही खूप महत्वाची आहे. असं अवेळी झोपणे किंवा झोपं पूर्ण न घेणे ह्याने देखील केस पांढरे होऊ शकतात.
 कधी कधी हे अनुवांशिक देखील असतं. जर तुमच्या कुटुंबातील कुणाचे म्हणजेच आजी-आजोबा, आई-वडील ह्यांचे केस जर अवेळी पांढरे झाले असतील, तर तुमचे केस देखील अवेळी पांढरे होऊ शकतात. आपले केस पांढरे व्हायला लागले की, आपण लगेच त्याला डाय करायला लागतो. पण जास्त डाय केल्याने केस आणखी पांढरे होण्याची शक्यता असते. कारण ह्यात वापरण्यात आलेले केमिकल्स केसांकरिता अत्यंत हानिकारक असतात. आणि सध्या तर जाहिरातीत सुद्धा दाखवतात की केमिकल्स शिवाय डाय आले आहेत पण खरं बघायला गेलं तर कोणताही डाय केमिकल्स शिवाय बनूच शकत नाही, कारण त टिकण्यासाठी त्यात केमिकल्स सारख्या गोष्टी घालाव्याच लागतात!