
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 2 लाख 41 हजार 921 एवढय़ा विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी 6 लाख 45 हजार 228 इतके अर्ज सादर केले आहेत. प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीच्या वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून पुढील प्रवेश प्रक्रिया वेळापत्रामध्ये नमूद केल्यानुसार होणार आहे.
मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया 9 जून ते 25 जून 2022 पर्यंत राबविली होती. यामध्ये विविध विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
विद्याशाखानिहाय वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 3 लाख 84 हजार 832, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 1 लाख 83 हजार 513 , मानव्य विद्याशाखा 74 हजार 421 आणि आंतर विद्याशाखेसाठी 2 हजार 462 असे एकूण 6 लाख 45 हजार 228 एवढे अर्ज सादर करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांव्यतिरिक्तही विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
अभ्यासक्रमाचे नाव प्रवेश अर्ज
बीकॉम 156708
बीएमएस 118564
बीकॉम 74799
(अकाऊंट ऍण्ड फायनान्स)
बीए 47103
बीएस्सी आयटी 79174
बीए एमएमसी 25680
बीएस्सी 35896
बीएस्सी (कम्प्युटर सायन्स) 40881
बीकॉम (बँकिंग ऍण्ड इन्शुरन्स) 15022
बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) 11061

































































