पतीने ट्रिपल तलाक दिल्याने पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

राज्यसभेत मंगळवारी ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याला अवघे काही तास होत नाही तोच अहमदाबादमधल्या मुसलमानाने त्याच्या बायकोला तलाक दिला. यामुळे निराश झालेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पीडितेने पती व सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसभेनंतर राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ताक्षरानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. तिहेरी तलाकविरोधात कायदा अंमलात आल्यानंतर तिहेरी तलाक देणाऱ्या नवऱ्याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. कायदा अंमलात आल्यानंतर पत्नी किंवा तिचे नातेवाईक नवऱ्याविरोधात आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करू शकतील. तसेच या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवल्यास आरोपींना जामीन मिळणं जवळपास अशक्य होईल.