गुजरातमधून इसिसच्या तीन दहशतवाद्यांना अटक; देशभरात हल्ल्याचा मोठा कट उधळला

इसिसशी संबंधित तीन दहशतवाद्यांना गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने गांधीनगर येथून अटक केली आहे. हे तिघेही उत्तर प्रदेशमधून गुजरातमधील अडलाज येथे आले होते.

डॉ. अहमद मोहिद्दीन अब्दुल कादेर जिलानी, मोहम्मद सुहेल मोहम्मद सुलेमान, अझाद सुलेमान सैफी अशी त्या तिघांची नावे आहेत. हे तिन्ही दहशतवादी 22 ते 25 वयोगटातील आहेत.

हे तीन दहशतवादी देशभरात एका मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. ते उत्तर प्रदेशमधून गुजरातला शस्त्र खरेदीसाठी आले होते. हे तीन दहशतवादी गुजरातला येत असल्याची माहिती मिळताच गुजरात पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली.