
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते भुजमध्ये 14 हजार भूपंपग्रस्तांना मालमत्ता पत्र देण्याचा कार्यक्रम शनिवारी झाला. त्यावेळी नगरविकास आणि शहर गृहनिर्माण विभागाचे प्रमुख जिगर पटेल यांना डुलकी लागली. कार्यक्रमानंतर काही तासांनंतर कॅमेऱ्यात ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे त्यांच्याविरोधात खात्यांतर्गत कारवाई करत कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या अधिकाऱयाला निलंबित करण्यात आले.






















































