ब्रेकिंग – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रुपानी यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला संधी दिली, त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच यापुढे पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याने गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता मुख्यमंत्रीपदाची सुत्रे कोणाच्या हातात देण्यात येणार, याबाबत चर्चा सुरू आहे. पक्षातील अंतर्गत कलहामुळे रुपानी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपात वेळेनुसार जबाबदाऱ्या बदलत असतात. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली असून यापुढे पक्षासाठी काम करणार असल्याचे रुपानी यांनी सांगितले.