
गुजरातमध्ये कोरोनाचा XE व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. गुजरातमध्ये या नव्या व्हेरिएंटची पुष्टी करण्यात आली आहे. हा व्हेरिएंट खूपच संक्रामक मानला जात आहे. या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.
गुजरातमध्ये एक रुग्ण 13 मार्चला आढळला होता. मात्र, आठवड्याभरानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्याच्या सँपलच्या तपासणीत त्याला XE व्हेरिएंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा व्हेरिएंट जास्त संक्रामक मानला जात आहे. BA.2 पेक्षा XE व्हेरिएंट 10 टक्के जास्त संक्रामक असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये एकच रुग्ण आढल्याने जनतेने चिंता करू नये. मात्र, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने चिंतेची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, या व्हेरिएंटचा फैलाव होऊ नये, यासाठी सरकारकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.
























































