गुजरातेत पहिल्या टप्प्यात 60 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात आज 60 टक्के मतदान झाले. 19 जिल्हय़ांतील 89 जागांवर 788 उमेदवारांचे भवितव्य आता मशीनबंद झाले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा 10 टक्के कमी मतदान झाले असून सौराष्ट्रात फक्त 42 टक्के मतदान झाले आहे.

मतदानाच्या टक्केवारीवर विजयाची गणिते बांधली जात आहेत. 2017 च्या निवडणुकीत ज्या जागांवर 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते त्या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. 27 पैकी 14 काँगेस, तर 11 जागा भाजपने ताब्यात घेतल्या होत्या.

दक्षिण गुजरातमध्ये यावेळी 56 टक्के मतदान झाले असून त्या तुलनेत सौराष्ट्रात 14 टक्के कमी मतदान झाले. फक्त मोरबी जिल्हय़ात 53.75 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.