बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी

बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप असलेले साई इन्फोसिस्टम लिमिटेडचे मालक सुनील कक्कड यांनी गुजरात उच्च न्यायालयाने परदेशी जाण्याची परवानगी दिली आहे. हिंदुस्थानात बॅक एन्ड आयटी सपोर्ट आणि एन्टरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेयरसाठी व्यापारांच्या संधी मिळवण्यासाठी त्यांना दुबईत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कक्कड यांना 2014 मध्ये लायबेरियात अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्याची सीबीआय चौकशी करत आहे. ईडीकडून संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी केली जात आहे. बँक ऑफ बडोदाच्या मागणीनंतर कक्कड विरोधात लूक आउट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले होते. बँक ऑफ बडोदाच्या वकीलांनी कक्कडच्या परदेश यात्रेच्या याचिकेला न्यायालयात विरोध केला होता. कक्कड ज्या साई इन्फोसिस्टमचे प्रमुख आहेत त्या कंपनीला बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेले आहे. कक्कड यांनी त्या बँकांचा एक पैसाही परत केलेला नाही.