
बायकोचा विरह सहन न होऊन पतीने तिला अशी जीवघेणी मिठी मारली की त्या स्फोटात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना गुजरात येथील अहमदाबाद जिल्ह्यात घडली आहे.
मृत दांपत्याचं नाव लाला पागी आणि शारदा पागी असं आहे. अहमदाबाद येथे राहणाऱ्या लाला पागी याची पत्नी सुमारे दीड महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी, मेघराज नावाच्या शहरात येऊन राहत होती. शारदा हिच्या भावाच्या म्हणण्यानुसार, लाला पागी याच्या कुटुंबाकडून होणारा त्रास आणि छळ सहन न झाल्याने ती माहेरी आली होती.
लाला ती परत यावी यासाठी मिनतवाऱ्या करत होता. मात्र, ती घरी यायला तयार नव्हती. अखेर गुरुवारी लालाने तिचा विरह सहन न होऊन एक भीषण पाऊल उचललं. त्याने छातीला जिलेटिनच्या काड्या बांधल्या आणि तो तिच्या माहेरी तिला भेटायला आला.
नवऱ्याला पाहताच शारदा त्याच्या जवळ आली. लालाने तिला मिठी मारली आणि त्याच क्षणी स्फोटकांची कळ दाबली. एक भीषण स्फोट होऊन दोघांचाही त्यात मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की दूरपर्यंत ऐकू गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दांपत्याला 21 वर्षांचा मुलगा आहे. लालाने ही स्फोटकं त्यांच्या परिसरातील आदिवासींकडून घेतली होती. आदिवासी या स्फोटकांचा उपयोग मासेमारीसाठी करतात.





























































