
सामना ऑनलाईन। अहमदाबाद
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील गणदेवा गावात ख्रिश्चनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. धर्म प्रसार व प्रचार करण्याचे काम ख्रिश्चन लोकं करत असल्यानेच ही प्रवेश बंदी करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
गणदेवा गावात एकून 7,500 हिंदू राहतात. यातील अनेकजण अनुसूचित जाती जमातीचे आहेत. हलाखीचे जीवन जगणाऱ्या या हिंदूंना मिशनरी लोक पैशाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतरण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आतापर्यंत 900 लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. दर रविवारी गावात पादरी येतात व गरीब लोकांचे धर्मांतरण करत असल्याचे गावाचे उपसरपंच जयंत मिस्त्री यांनी सांगितले आहे. यामुळे गावाच्या प्रवेशद्वारावरच ख्रिश्चनांना नो एन्ट्रीचे फलक लावण्यात आले आहेत.























































