काश्मीर थंडगार, पण गुलमर्ग हिमवृष्टीविना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या हिवाळ्यात कश्मीर थंडगार पडले असले तरी, स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमध्ये अद्यापही हवी तितकी हिमवृष्टी झालेली नाही. यामुळे येथे दरवर्षी स्कीइंगसाठी येणाऱया देशी-विदेशी पर्यटकांची निराशा झाली आहे. जागतिक हवामानातील बदलांमुळे हिमवृष्टी न झालेला गुलमर्गचा परिसर, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटक सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे. गेल्या जानेवारीमध्ये गुलमर्गमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली होती. सर्व परिसरात 5 ते 6 फूट बर्फ साचले होते. मात्र, आता जानेवारी 2024 मध्ये अशा हिमवृष्टीचा अद्याप तरी पत्ता नाही.