
चारित्र्यावर संशय घेऊन अभियंत्या पतीने पत्नीवर चाकूने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली.
ज्योती राजेंद्र गायकवाड (वय 28, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय 31) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गायकवाड खासगी कंपनीत अभियंता आहे. मागील काही महिन्यांपासून तो ज्योतीचा चारित्र्याच्या संशयातून छळ करत होता. सोमवारी (5 डिसेंबर) सकाळी त्यांच्यात वाद झाले. त्याच रागातून त्याने चाकूने ज्योतीवर वार करून खून केला.
घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी हडपसर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारांपूर्वीच ज्योतीचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
























































