
एकमेकांकडे बघण्याच्या रागातून तिघाजणांनी तरुणावर शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हडपसरमध्ये घडली.
या प्रकरणी युनूस खान, तालिब खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सलमान वझीर शेख (वय 23, रा. सय्यदनगर, हडपसर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि युनूस यांचे पुर्ववैमनस्य आहे. दोन दिवसांपूर्वी सलमान आणि त्याचा मित्र दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाजवळ युनूस आणि सलमानने एकमेकांकड पाहिले.
त्याचा राग आल्यामुळे युनूसने साथीदारांच्या मदतीने सलमानवर शस्त्राने वार करून जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.






























































