११ वर्षांच्या मुलीच्या पोटातून निघाला केसांचा गोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । डेहराडून

जगात चित्र-विचित्र गोष्टी नेहमीच घडत असतात. अशीच एक विचित्र घटना डेहराडूनमध्ये घडली आहे. येथे एका मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क केसांचा गोळा बाहेर काढला आहे.

प्राची (११) असं त्या मुलीचं नाव आहे. डेहराडूनमध्ये विकासनगरात प्राची राहते. ११ वर्षीय प्राचीच्या पोटात चक्क केसांचा गोळा डॉक्टरांना सापडला आहे. प्राचीला केस खाण्याची विचित्र सवय लागली होती. त्यामुळे एक दिवस तिच्या पोटात खूप दुखू लागलं. तिला वारंवार उलट्या होऊ लागल्या. प्राचीच्या कुटुंबीयांनी तिला बुधवारी रुग्णालयात उपचारांकरता दाखल केलं. उपचारादरम्यान तेथील डॉक्टरांनी तिच्या पोटातून चक्क दीड किलोंच्या केसांचा गोळा बाहेर काढला आहे.

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर के. के. टम्टा यांनी सांगितलं, १५ दिवसांपूर्वी प्राचीच्या वडिलांनी तिच्या पोटात दुखू लागल्याने व उलट्या होत असल्याच्या कारणाने प्राचीला रुग्णालयात आणल गेलं होतं.