#HappyBirthday अभिनेत्री ते खासदार, नुसरत जहांच्या दिलखेचक अदा

1377

बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल येथील बशीरघाटकडून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां हिचा आज वाढदिवस आहे.

nusrat1

8 जानेवारी, 1990 ला कोलकातामध्ये नुसरत जहां हिचा जन्म झाला. आज हिने वयाची तिशी गाठली असून 31 व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे.

nusrat-jahan6

खासदार झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील दिलखेचक फोटो व्हायरल होत असतात. अनेकदा तिच्या फोटोंवरून वादही होतात, तर कधी ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांच्या उड्या पडतात.

nusrat-jahan2

अनेकदा धर्मनिरपेक्षता आणि परंपरा तोडणारे मेसेज फोटोसह व्हायरल करणारी नुसरत चर्चेचा विषय असते. ट्रोलर्स आणि धर्मांधांना न घाबरती ती आपल्याला पटेल ते करते.

nusrat-jahan7

अभिनयासह  राजकारणात पाऊल ठेवलेल्या अभिनेत्री नुसरत जहां हिने गेल्यावर्षी तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली. पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून ती उभी राहिली होती आणि जिंकलीही.

nusrat-jahan1

निवडणूक जिंकल्यानंतर नुसरत पाश्चात्य कपड्यांमध्ये संसदेमध्ये पोहोचली त्यामुळे ट्रोलर्सने तिला ट्रोलही केले. यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ती साडीमध्ये संसदेत पोहोचली आणि आपल्या पहिल्याच भाषणाद्वारे सर्वांचे मन जिंकले.

nusrat-jahan10

निवडणुकीदरम्यानच नुसरत हिने कोलकाता येथील उद्योगपती निखील जैन याच्याशी विवाह केला. हिंदू पद्धतीने विवाह केल्याने आणि मंगळसुत्र घातल्याने धर्मांधांनी तिच्याविरोधात फतवाही काढला.

nusrat-jahan8

धर्मांधांच्या फतव्याला न घाबरता नुसरत हिंदू धर्माच्या विविध सणांमध्ये सहभागी झाली. पश्चिम बंगालमधील दुर्गापुजावेळी ती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह उपस्थित होती.

nusrat-durga

अभिनेत्री ते खासदार असा प्रवास केलेली नुसरत जहां सोशल मीडियावर आपले ग्लॅमसर फोटो अपलोड करत असते. खासदार असतानाही आपली आवड जपणाऱ्या नुसरत नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे.

nusrat-jahan

आपली प्रतिक्रिया द्या