
मिस युनिव्हर्स स्पर्धेत तब्बल 21 वर्षांनी हिंदुस्थानचा डंका वाजला आहे. हरनाज कौर संधू या हिंदुस्थानी तरुणीने मिस युनिव्हर्स 2021च्या लखलखत्या मुकुटावर आपलं नाव कोरलं आहे.
70वी मिस युनिव्हर्स ही स्पर्धा सोमवारी सकाळी इस्त्रायल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत हरनाज कौर हिने हिंदुस्थानचं नाव उंचावत 2021ची मिस युनिव्हर्स होण्याचा मान पटकावला आहे. हरनाज कौर संधूनंतर पराग्वे देशाकडून आलेली तरुणी दुसऱ्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिकेची तरुणी तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
View this post on Instagram
हरनाजपूर्वी 1994मध्ये सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता या दोघींनी हा किताब आपल्या नावे केला होता. आता हिंदुस्थानच्या खात्यात तिसऱ्यांदा या विजयाची भर पडली आहे.
View this post on Instagram
कोण आहे हरनाज कौर संधू
हरनाज ही चंदिगढची रहिवासी असून तिचा जन्म शीख कुटुंबात झाला आहे. 2017मध्ये हरनाजने मिस चंदिगढचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने दोन मुकूट आपल्या नावे केले. 2019च्या मिस इंडिया स्पर्धेतही तिने अंतिम 12 जणींमध्ये स्थान पटकावलं होतं. तिला अभिनयात करिअर करायचं असून दोन पंजाबी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ते चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होतील.



























































