जी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक

104

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची बीड येथून बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची नियुक्ती झाली आहे. श्रीधर कडक स्वभावामुळे बीड जिल्हा पोलीस दलात एक चांगला अधिकारी म्हणून परिचित आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून त्यांच्या बदलीची चर्चा होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहविभागाने राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात श्रीधर यांची बदली राज्य राखीव दलाचे समादेशक म्हणून झाली आहे.

जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेला बळकटी दिली होती. नवीन अधीक्षकांसमोर वाळू माफिया, कायदा सुव्यवस्था, अवैध धंदे यांचे मोठे आव्हान असणार आहे. हर्ष पोद्दार यांनी कोलकत्ता येथून लॉ ची पदवी प्राप्त केली असून पदव्युत्तर शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथे घेतले आहे. काही काळ त्यांनी कॉर्पोरेट लॉयर म्हणून लंडन येथे काम केले आहे. 2010 च्या बॅचमध्ये यूपीएससी परीक्षेत 310 व्या रँकने ते उत्तीर्ण झाले होते. त्यांनी नागपूरपूर्वी संभाजीनगरमध्येही काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या