अमेठीत सोनियांचे निकटवर्तीय हारून रशीद लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमेठी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी काँग्रेस पक्षापुढे रोज नवनव्या समस्या उभ्या ठाकत आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी उमेदवार असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय नेते मोहम्मद सुलतान यांच्या मुलाने पक्षाविरुद्ध शड्डू ठोकत अमेठीत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गांधी घराण्याचे निष्ठावंत हाजी मोहम्मद हारून रशीद थेट राहुल यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.