ज्योती मल्होत्राचा अॅसेट म्हणून वापर

हरयाणाची यूटय़ूबर ज्योती मल्होत्रा पहलगाम हल्ल्याप्रसंगी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होती, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या लॅपटॉप, मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस यांची आयटी आणि सायबर विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्योतीसारख्या नागरिकांचा शत्रू राष्ट्रांकडून अॅसेट म्हणून वापर होत असल्याचा हरयाणा पोलिसांनी दावा केला आहे. ज्योतीचे पाकिस्तानी दुतावासातील मूळ हिंदुस्थानी वंशाचा नागरिक दानिश याच्याशी संपर्क आला. त्या दोघांचा चांगला परिचय झाला होता. तिच्या उत्पन्नापेक्षा ट्रव्हल ब्लॉगचा खर्च अधिक होता. , असे हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार म्हणाले. ज्योती पहलगाम हल्ल्याप्रसंगी पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयांच्या संपका&त होती, असे पोलीस म्हणाले.