हाथरस पुन्हा हादरले; दोन अल्पवयीन मुलांचा 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

हाथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता हाथरसमध्ये चार वर्षांच्या मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने हाथरस पुन्हा हादरले आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

हाथरसजवळील गावात एका चार वर्षांच्या मुलीवर 9 आणि 12 वर्षांच्या दोन मुलांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून दोघेही अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार पुढील कारवाई येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी घटनेची माहिती दिल्यानंतर तक्रार दाखल करून मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांबाबत असलेल्या कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हाथरसमध्ये गेल्या महिन्यात दलित तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात संताप व्यक्त झाला होता. ही घटना ताजी असतानाच हाथरसमध्ये चार वर्षांच्या मुलीवर अल्पवयीने मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या