
उपवास म्हटल्यावर काय खायचं हा प्रश्न आपल्याला कायम पडतो. श्रावण सुरु होताच अनेकजण उपवास करायला सुरुवात करतात. परंतु उपवासाला काय खायचं हा प्रश्न मात्र सतावत असतो. रोज रोज साबुदाणा खाऊन कंटाळा येतो. तसेच बटाटा हा प्रत्येकालाच मानवतो असंही नाही. शिवाय उपवासाच्या दिवसांमध्ये उर्जावान राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
उपवासाच्या दिवसांमध्ये उर्जावान राहण्यासाठी, आपण काही ठराविक फळे ही खायलाच हवीत. यामुळे आपण दिवसभर उर्जावान राहू.
दररोज दुधात भिजवलेले 2 खजूर खाल्ले तर मिळतील आश्चर्यकारक फायदे
सफरचंद खाणे हृदयासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर सफरचंदाचे सेवन ऊर्जा देण्याचे काम देखील करते. उपवास करत असाल आणि खूप काम करत असाल तर, दिवसभर उर्जावान राहण्यासाठी किमान एक सफरचंद हे खायलाच हवे.
केळी हे असे फळ आहे जे खाल्ल्यानंतर पोट भरलेले वाटते आणि अशक्तपणा येत नाही. म्हणून उपवास करत असाल तर, कामाच्या दरम्यान किंवा सकाळी एक किंवा दोन केळी खा.
व्हिटॅमिन सी आणि पाण्याने समृद्ध संत्री शरीराला हायड्रेट ठेवते आणि ऊर्जा देखील देते. याशिवाय स्ट्रॉबेरी, द्राक्षे, किवी सारखी लिंबूवर्गीय फळे देखील त्वरित ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.
उपवास करत असाल तर फळांव्यतिरिक्त तुम्ही खजूर खाऊ शकता. सकाळी खजूर खाल्ले तर ते भरपूर ऊर्जा देईल. याशिवाय बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर यांसारखे कोरडे फळे रात्रभर भिजत घाला आणि सकाळी खा. तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. याशिवाय पाणी पिण्याकडे लक्ष द्या.