
कागदपत्रे देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हवेली रेकॉर्ड रूमच्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. भोसले असे पकडण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.
संबंधित महिला कर्मचारी हवेली तहसील रेकॉर्डरूम येथे नोकरीस आहे. तक्रारदार यांना काही कागदपत्रे हवी होती. यामुळे त्यांनी अर्ज केला होता. पण महिला कर्मचारी भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 गुंठा जागा आणि 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात महिलेने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचून एसीबीच्या पथकाने भोसले यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे.
































































