हे सरकार कोसळावे अशी सिद्धरामय्यांचीच इच्छा, देवेगौडांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेंगळूरू

कर्नाटकमधील कुमारस्वामींचे सरकार सध्या व्हेंटिलटरवर आहे. काँग्रेस आणि जेडीएसमधील मतभेद समोर येत आहे.  असे असताना जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या सर्ग राजकीय घडामोडींच्या मागे सिद्धरामय्या यांचा हात असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

देवेगौडा म्हणाले की, “ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत ते सर्व सिद्धरामय्या यांचे समर्थक आहेत. तसेच या राजकीय घडामोडींच्या मागे त्यांचाच हात आहे.”

मंत्री डीके शिवकुमार यांनी रविवारी देवेगौडा यांची भेट घेतली. सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्री असावे अशी काही जणांची इच्छा आहे शिवकुमार यांनी गौडा यांना सांगितले. तसेच सिद्धरामय्याच सगळ्यांना एकत्र घेऊन सरकार चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.