एचडीआयएलच्या खरेदीसाठी 6 कंपन्या इच्छुक

714

कर्जात बुडालेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इप्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीच्या खरेदीसाठी देशभरातील नऊ कंपन्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. ज्यात अदानी प्रॉपर्टीज, सुरक्षा असेटरी आणि सनटेक रियालिटीसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

पीएमसी बँकेकडून घेतलेले हजारो कोटींचे कर्ज थकविल्याने एडीआयएल ही कंपनी दिवाळखोरित निघाली आहे. त्यामुळे सध्या कंपनीवर एनसीएलटी कायदा अंतर्गत कारवाई सुरु आहे. सध्या कंपनीचे सर्व व्यवहार कायदेतज्ञ अभय एन. मनुधाने हे पाहत आहेत. नॅशनल कंपनी ऑफ लॉ ट्रिब्युनलने मनुधाने यांची निवड केली आहे. कंपनीच्या दिवाळखोरीची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरु झाली होती. त्यावेळेस एक्सप्रेशन ऑफ इंटेस्ट जाहीर करण्यात आला होता. यासाठी इच्छुकांना 31 जुलै 2020ची मुदत देण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या