Health Tips – सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ 7 पदार्थ खाऊ नका, आजारांना द्याल आमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक जण दिवसाची सुरुवात सकाळी कोमट पाणी पिऊन करतात, तर काहींना बेडवरच चहा-कॉफी लागते. गरमागरम चहासोबत बिस्कीट किंवा ब्रेड मिळाल्यास त्याचा स्वाद आणखीच वाढतो. चहानंतर लोक नाष्टा करण्यास पसंती देतात. नाष्ट्यामध्ये पोहे, समोसा, आमलेट, फळांचे रस इत्यादींचे सेवन करतात. बराचकाळ आपण झोपेत राहिल्याने पचनतंत्र पुन्हा सुरळीत सुरू होण्यास वेळ लागतो. तज्ज्ञ सांगतात की सकाळी उठल्यानंतर जवळपास 2 तासांनी नाष्टा करणे कधीही चांगले. तसेच सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी खाणे टाळणे आवश्यक आहे. असे अनेक पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास आजारांना आमंत्रण मिळू शकते.

मसालेयुक्त पदार्थ

रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाणे चांगले नाही. कारण यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. यामुळे पित्ताचा त्रास वाढून डोकेदुखीही सुरू होऊ शकते. मसाले नैसर्गिकरित्या तिखट असल्याने यामुळे अपचन होऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी समोसा, कचोरी, भजी खाणे टाळलेलेच चांगले.

फळांचे रस

आपल्यातील बहुतांश लोक दिवसाची सुरुवात फळांचा रस पिऊन केल्याने चांगली होईल असे मानतात. परंतु असे करणे चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी फळांचे रस खाणे योग्य नाही. यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडतो, जे शरिरासाठी चांगले नाही. फळांच्या रसातील अतिरिक्त साखरेमुळे लिव्हरवरही दबाव येऊ शकतो.

दही

दह्यामध्ये लॅक्टिक एसिड असते आणि यामुळे पोटीतील पित्त खवळू शकते. रिकाम्या पोटी दह्याचे सेवन केल्याने लॅक्टिक एसिड बॅक्टिरियावर हल्ला करू शकतात आणि यामुळे एसिडीटीची समस्या उद्भवू शकते.

प्रवासात उलट्या, मळमळ होण्याचा त्रास होतो, त्वरित आरामाकरिता करा ‘हे’ उपाय

नाशपाती फळ

नाशपाती (Pear) फळामध्ये कच्चे फायबर असले आणि यामुळे पोटाच्या नाजू भागांना इजा पोहोचू शकते. हे फळ रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते. सकाळी खायचेच असेल तर जाग आल्यानंतर दोन तासांनी ओट्स सोबत खावू शकता.

आंबळ फळं

फळांचे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते, परंतु योग्यवेळी खाल्ले तरच. रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ले तर एसिडीटी होऊ शकते. तसेच यात फायबर आणि फ्रक्टोजचे प्रमाण अधिक असल्याने पचनचक्राचा वेग कमी होऊ शकतो.

कच्च्या भाज्या

जेवताना सलाद म्हणून कच्च्या भाज्यांचे सेवन करणे योग्य आहे, मात्र रिकाम्या पोटी तेवढेच घातक आहे. कच्च्या भाज्यांमध्ये फायबर अधिक असते आणि यामुळे पचनशक्तीवर अतिरिक्त ताण पडतो. यामुळे पोट फुगणे किंवा पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.

कॉफी

अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते. परंतु रिकाम्या पोटी कॉफी कधी सेवन करू नका. यामुळे एसिडीटी वाढू शकते. तसेच पचनतंत्रातील हायड्रोक्लोरिक एसिडचा अतिरिक्त स्त्राव होऊन पोटीची समस्या निर्माण होऊ शकते. तज्ज्ञ सांगतात सर्व आजारांचे मूळ हे तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि पोटाशी निगडीत असतात.

हळदीच्या ‘या’ उपायांमध्ये आहे नशीब बदलवण्याची ताकद, तुम्हीही जाणून घ्या