
हिंदू धर्मात हळदीला पवित्र मानले जाते. हळदीचे प्रत्येक दिवसासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. शिवाय सण, लग्न, जोतिष, आयुर्वेद आणि धार्मिक कार्यात सर्वत्र हळदीचा वापर गुणकारी मानला जातो. केवळ आरोग्यासाठी नाही तर रोजच्या जीवनातील काही अडचणी सोडवण्यासाठीही हळदीला अतिशय महत्त्व आहे. हळदीचा संबंध बृहस्पती देवाशी आहे. ज्यांना आपल्या जीवनात सुख, समृद्धी हवी आहे त्यांनी हळदीचा वापर करावा, असे शास्त्र सांगते. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी श्रीहरीला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात. कारण श्रीविष्णूला पिवळा रंग खूप प्रिय आहे असे म्हणतात. त्यामुळे गुरुवारी हळदीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या हळदीच्या काही उपायांमुळे तुमचे नशीब बदलू शकते. चला जाणून घेऊया या चमत्कारीक उपायांबद्दल.
– घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तूदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येण्यासाठी गुरुवारी घरात हळदीचे पाणी शिंपडावे. हा उपाय केल्याने लक्ष्मीदेवीची कृपा होऊन वास्तूदोषही दूर होतात.
– आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी हळद घ्या आणि विष्णु सहस्रनामाचा पाठ करा. यामुळेश् श्रीष्णुची कृपा होऊन आर्थिक संकटातून सुटका व्हायला मदत होईल.
– पैशाची कमतरता दूर होण्याकरिता एका कपड्यात 5 अख्खी हळकुंड बांधून लॉकर, कपाट किंवा तिजोरीत पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.
– हळदीची माळ विष्णूला खूप प्रिय आहे. त्यामुळे गुरुवारी, फक्त विष्णू किंवा बृहस्पती या मंत्राचा जप करण्यासाठी हळदीच्या माळीचा वापर करावा. असे केल्याने हा मंत्र लवकरच सिद्ध होईल आणि या दोन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील.
– लग्नामध्ये विलंब होत असेल किंवा लग्नाच्या गोष्टी बिघडत असतील तर तुम्ही विशेषत: गुरुवारी पाण्यात एक चिमूटभर हळद घालून आंघोळ करा.
– जोडीदाराकडून मिळणारे प्रेम टिकवण्यासाठी घराबाहेर भिंतीवर हळदीने स्वस्तिक बनवा. हा उपाय केल्याने तुमच्या सुखी वैवाहिक आयुष्याला कोणाचीही नजर लागणार नाही.
टीप – वरीलपैकी कोणत्याही उपायाचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.