Health Tips – तोंडाच्या दुर्गंधीची कारणे आणि 5 घरगुती उपाय

3843

बऱ्याचदा संवाद साधताना समोरच्याच्या तोंडातून एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि शिसारी येते. अशा वेळी सर्वांसमोर आपण त्याला तोंडाची दुर्गंधी येत असल्याचे सांगू शकत नाही. कधीकधी यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपली वाईट छाप उमटते.

मात्र श्वासांच्या दुर्गंधीची फक्त अपचन किंवा कांदा खाणे हीच नाही तर अनेक कारणे असू शकतात.

1. पचन क्रियेत बिघाड
2. दात कुजणे
3. पोटात काही गडबड होणे
4 हिरड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणे

अशी बरीच कारणे यामागे असू शकतात. मात्र योग्य आहार काही घरगुती उपाय केल्यास यापासून तुमची सुटका होऊ शकते. जाणून घेऊया…

1. पाणी
योग्य प्रमाणात आणि वेळेत पाणी प्यायल्याने तोंडाची स्वच्छता होण्यास मदत होते. तसेच पाणी क्लींजरचे का करते आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. दिवसभर आपण काही ना काही खात असतो आणि यामुळे तोंडातील बॅक्टेरिया दात आणि हिरड्यांना टार्गेट करतात. कमी पाणी प्यायल्याने आपल्या तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे किंवा चूळ भरत राहावे.

Health Tips – घरच्या घरी असा बनवा आयुर्वेदिक काढा अन झटपट रोग प्रतिकारशक्ती वाढवा

2. संत्री, लिंबू, दही
संत्री, लिंबू आणि दही यात सी व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते. याच्या सेवनाने फक्त प्रतिकारशक्ती आणि चेहऱ्यावरील तेज वाढत नाही तर, श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकतो.

Health – प्रतिकारशक्तीच नाही तर लैंगिक क्षमताही वाढवते ही आयुर्वेदिक वनस्पती, जाणून घ्या फायदे-तोटे

3. बडीशेप
जेवण झाल्यावर बडीशेप खाण्याचा फायदा आहे. यामुळे जेवणाचे पचन तर होतेच शिवाय श्वासांची दुर्गंध घालवण्यासाठी ही उपयोगी आहे.

Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

4. लवंग आणि वेलची
लवंग आणि वेलची (वेलदोडा) यामुळे देखील तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळते. वेलदोडामध्ये अँटीसेप्टिक असल्याने व हळूहळू चावून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते. तर भाजलेली किंवा कच्ची लवंग खाल्ली तरी त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.

5. दालचीनी
दालचीनीच्या गोड चवीमुळे भाजी, मसाले, काढा यांना तर चव मिळतेच, शिवाय यात असणाऱ्या अँटीसेप्टिक गुणामुळे तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.

Health Tips – झोपण्यापूर्वी खजूर खाण्याचे ‘हे’ 8 फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल

आपली प्रतिक्रिया द्या