
तामीळनाडूतील आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या कावेरी ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या चेन्नईतील कावेरी रुग्णालयाने कोचीच्या अॅस्टर मेड सिटी यांच्याशी दक्षिण हिंदुस्थानासाठी हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाबाबत सहकार्य करार केला आहे. दक्षिण हिंदुस्थानातील सर्वाधिक मोठय़ा केंद्रांपैकी हे आरोग्य केंद्र आहे. अॅस्टर डीएम हेल्थ केअर या समूहाचे प्रमुख रुग्णालय आहे. कावेरी रुग्णालयाशी सहकार्य करार केल्याने या रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांना कोची येथील अॅस्टर आरोग्य केंद्रामध्ये हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, हृदय, फुप्फुसांच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी हा करार फायदेशीर ठरणार आहे.





























































