Exclusive: कुर्ल्यात रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kurla-station-water-logged1

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत सोमवारी सकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगराच्या काही भागात पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळाला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुर्ला रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस जर असाच कोसळत राहिला तर याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीएसएमटीच्या दिशेने सुरू असलेली रेल्वे वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.