हेल्मेटची डोकी एकमेकांवर धडकली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दुचाकीची वाढती संख्या आणि दुचाकीचे झालेले सर्वाधिक अपघात पाहता दुचाकीवर पाठीमागे बसणाऱयांना हेल्मेटसक्ती केल्याने मुंबईकरांचे आज चांगलेच वांदे झाले. त्यामुळे हेल्मेटची डोकी एकमेकांवर तर धडकलीच शिवाय पतीवर पाठीमागे बसणारी पत्नी तर बॉयफ्रेंडवर गर्लफ्रेंड भडकली आणि पाचशेची पावती फाडावी लागल्याने बाईकस्वारांना सकाळी सकाळी चांगलीच पह्डणी बसली.

मुंबईत वाहतूक विभागाने दुचाकीवर पाठीमागे बसणाऱया सहप्रवाशालाही हेल्मेट घालणे बंधनकारक केल्याने गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केली आहे. यामुळे बाईकने प्रवास करणाऱया मुंबईकरांना आपल्या बाईकवर पाठीमागे बसलेल्यांसाठी दंड भरावा लागला. त्यामुळे जागोजागी नाक्यावर पोलीसदादा तर उभे नाहीत ना याची जरा जास्तच काळजी दुचाकीस्वारांनी घेत गमिनी कावा करण्याचा प्रयत्न केला.

बाईक चालविणारे जरा जपूनच

मुंबई शहरात वाहनांची संख्या वाढतच चालली असून दुचाकाRची संख्या 25 लाख 41 हजार इतकी झाली आहे, तर रस्ते वाहन अपघाती मृत्यूत सर्वाधिक 166 मृत्यू (47.42 टक्के) दुचाकीला झालेल्या अपघातात झाले आहेत. त्यामुळे मुंबईत दुचाकीच्या मागे बसणाऱया सहप्रवाशानेही हेल्मेट घालावेत असे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले असून त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे.

6271 जणांवर कारवाई

आजपासून त्यावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आज सायंकाळपर्यंत दोन हजार 334 चालक, तीन हजार 421 सहप्रवासी तर एकाच वेळी दोघांनीही हेल्मेट न घातलेले 516 जण पोलिसांना सापडले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दक्षिण मुंबईत हेल्मेट न वापरणारे बेजबाबदार 914 चालक व दोन हजार 100 सहप्रवासी असे तीन हजार 109 जण सापडले. तर मध्य मुंबईत केवळ 769 जण विनाहेल्मेट प्रवास करताना सापडले. याच परिसरात एकावेळी दोघे विनाहेल्मेट फिरताना केवळ 90 जण सापडले. आज पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सहा हजार 271 चालक व सहप्रवाशावर हेल्मेट न वापरल्यामुळे कारवाई केली.