धक्कादायक! पाच वर्षाच्या चिमुरडीवर अल्पवयीनाचा बलात्कार

700
प्रातिनिधिक फोटो

देशभरात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बलात्काराची एक  धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणातील पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत.

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला बालगुन्हेगारी न्यायालयासमोर सादर करणार आहे. पीडितेच्या मावशीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पीडित मुलगी परिसरातील मुलांसोबत खेळत असताना अल्पवयीन आरोपीने तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

आपली प्रतिक्रिया द्या