
शेअर बाजार सध्या सर्वोच्च पातळीवर आहे. याच आठवड्यात शेअर बाजाराने नवीन उच्चांकही गाठला. यामुळे गुंतवणूकदारांची पाची बोटं तुपात असून जबरदस्त फायदा होत आहे. गेल्या वर्षभरात अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यातील एक शेअर तर तब्बल 410 टक्के रिटर्न देऊन गेला आहे.
हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन (Hinduja Global Solution – HGS) हा शेअर सध्या गुंतवणूकदारांच्या हिटलिस्टवर आहे. याला कारणही तसेच आहे. जून 2020 मध्ये हा शेअर दोन पिझ्झाच्या किंतमींमध्ये अर्थात 666 रुपयांना मिळत होता, मात्र यंदा जून महिन्यात या शेअरचा भाव पार 3 हजार 396.6 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये ज्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील त्याचे आता 5 लाख रुपये झाले असतील.
सध्याच्या मार्केटबाबत बोलायचे झाल्यास हिंदुजाचा शेअर आजही अपर सर्किटला लागला होता. 2 ऑगस्ट 2021 ला या शेअरमध्ये 2.34 टक्के वाढ दिसून आली आणि शेअरची किंमत 3 हजार 470 रुपयांवर पोहोचली. तसेच गेल्या 200 दिवसात कंपनीचा शेअर ग्रिन झोनमध्येच दिसून येतोय.
जून 2021 च्या तिमाहीमध्ये हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन कंपनीचा प्रॉफिट 117.02 कोटी रुपये राहिला. तर गेल्या वर्षी हाच प्रॉफिट 47.94 कोटी रुपये एवढा होता. कंपनीची ऑपरेशनल इन्कम देखील 25 टक्के वाढली असून ती 1 हजार 550.52 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी ती 1 हजार 235.89 कोटी रुपये होती.
(टीप – शेअर बाजाराबाबत माहिती देण्याचा आमचा उद्देश असून कोणत्याही शेअरची खरेदी अथवी विक्रीसाठी आम्ही प्रोत्साहीत करत नाही)



























































