
रत्नागिरीतील इतिहास संशोधक,साहित्यिक श्रीकांत शेट्ये यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
श्रीकांत शेट्ये यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. वर्तमानपत्रातूनही ते स्तंभलेखन करत असत. भंडारी समाजाचे ते आधारस्तंभ होते. बहुजन समाजाच्या वतीने श्रीकांत शेट्ये यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना एक लाख रूपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. ते एक लाख रुपये शेट्ये यांनी भंडारी समाज संघटनेला दान केले होते.
































































