मोहीम फत्ते… शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले!

हिंदुस्थानसाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक व आनंदाचा ठरला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सफरीवर गेलेले हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशु शुक्ला सुखरूप पृथ्वीवर परतले. ते 18 दिवस अंतराळ स्थानकात होते. या मुक्कामात त्यांनी 60 वेगवेगळय़ा प्रयोगांमध्ये भाग घेतला. त्यांना घेऊन येणारे फाल्कन-9 हे यान तब्बल 23 तासांच्या प्रवासानंतर मंगळवारी सायंकाळी 4.45 वाजता पॅलिपहर्नियाच्या समुद्रात लँड झाले. शुभांशु हे हसतमुखाने यानातील ड्रगन पॅप्सूलमधून बाहेर पडले व हात उंचावून त्यांनी सर्वांना अभिवादन केले. आता पुढचा आठवडाभर शुभांशु व त्यांचे तीन सहकारी अंतराळवीर विलगीकरणात राहणार आहेत.