Photo- कापड कसे तयार केले जाते, जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुती, पॉलिस्टर, लिनन असे विविध प्रकारचे कपड्यांचे विविध प्रकार दैनंदिन जीवनात वापरले जातात. कपड्यांपासून तयार होणारे तऱ्हेतऱ्हेचे पोषाख, पडदे, टॉवेल, चादरी, उशांचे अभ्र, टेबलक्लॉथ हे सारेच कापडाचे प्रकार दैनंदिन जीवनात महत्त्वाचे मानले जातात. कापड तयार होण्याचा हा इतिहास सुमारे 35 हजार वर्षे जुना आहे. कापड कसे तयार होते हे जाणून घेऊया.

कापसाच्या तंतूंचे विणकाम करून कापड तयार केले जाते.

कापसापासून तयार होणारे तंतू केसांसारखे असून ते खूप लांब आणि पातळ आहेत. अनेक तंतू एकत्र आले की, त्यापासून दोरा तयार केला जातो.

काही तंतू प्राण्यांपासूनही मिळतात. मेंढीच्या लोकरीपासून तयार होणारी लोकर उबदार कपडे विणण्याकरिता उपयोगी पडते.

अर्जुन वनस्पतीची पाने खाणाऱ्या किटकांच्या अळ्यांपासून उत्तम रेशीम तयार केले जाते. तुती या वनस्पतीची पाने खाऊन कीटक जे रेशीम बनवतात त्याला तुतीचे रेशीम असे म्हणतात.

लोकर तयार करण्यासाठी मेंढ्यांच्या शरीरावरील 7.5 सेमी लांबीचे केस कापले जातात. ही लांबी एका क्रेयॉनच्या बरोबरीची आहे. मेंढ्यांच्या शरीरावरील केसांचे लोकरीत रुपांतर करताना ती अधिक पातळ होत जाते. हे तंतू अनेक मीटर रुंद असू शकतात.

कापड तयार करण्याच्या स्पिनिंग मशीनवर पातळ, जाड, मऊ असे कोणत्या प्रकारचे दोरे तयार करायचे ते अवलंबून असते.

विणकाम हाताने केले तर ते खूपच संथ गतीने होऊ शकते यासाठी यंत्राचा वापर केला जातो.

मशिनमध्ये रंगीत धागे टाकून हव्या त्या रंगाचे आणि डिझाइनचे कपडे तयार करता येतात.

कापड तयार झाल्यावर त्यापासून कुर्ता, सदरा, पॅंट किंवा पायजमा असे वेगवेगळ्या प्रकारचे पोषाख तयार करता येतात.