
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्यात लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट करणे आता बंधनकारक होणार आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे याबाबतीत कायदा करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
गोव्यासारख्या छोटया राज्यातही एचआयव्हीचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार एक नवीन कायदा करण्याचा विचार करत आहे. लग्नाची नोंदणी करण्याआधी पती-पत्नी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करून घेणे बंधनकारक करण्याचे विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होणार आहे. एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
























































