एचआयव्हीवर मात करणाऱ्या जगातील पहिल्या रुग्णाचे निधन

एचआयव्हीवर मात करून पूर्णपणे बरा झालेला जगातील पहिला रुग्ण टिमोथी ब्राऊन यांचे बुधवारी निधन झाले. जर्मनीच्या बर्लिन येथे त्यांचे वास्तव्य होते. एचआयव्हीमुक्त झालेला जगातीला पहिला रुग्ण म्हणून त्यांना ‘बर्लिन पेशंट’ या नावानेही ओळखले जात होते. टिमोथी ब्राऊन यांना तीव्र स्वरुपाच्या मायलोईड ल्यूकेमिया हा रक्ताचा कर्करोग होता. तसेच त्यांना 1995 पासून एचआयव्हीनेही ग्रासले होते. 2008 मध्ये त्यांनी स्टेम सेल प्रत्यारोपण करून ल्यूकेमियाबरोबरच एचआयव्हीवरही पूर्णपणे मात केली होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या पाठीच्या मणक्यात तसेच मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने ते आजारी होते. उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या